VIDEO : मॅच सुरू होऊन दोन मिनिटं झाली अन्..! पाहा शमीच्या पहिल्याच चेंडूवर कसा आऊट झाला केएल राहुल!

मुंबई: आयपीएल २०२२ मध्ये आज लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स पदार्पण सामना खेळण्यासाठी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर उतरले आहेत. लखनऊसाठी सलामीवीर डी कॉक आणि केएल राहुल डावाची सुरुवात करताना दिसले. मात्र सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर के एल राहुल बाद झाला आहे.

पर्दापणाच्या सामन्यात गुजरात टायटन्सचा (gujrat titans) कर्णधार हार्दिक पंड्याने (hardik pandya) नाणेफेक जिंकत आधी गोलंदाजीचा निर्णय घेतला. दोन्ही संघाचा हा पहिलाच सामना असल्याने के एल राहुल आणि क्विंटन डी कॉक ही नवीन जोडी फलंदाजीला उतरली. के एल राहुलचा (KL Rahul) पंजाबसह मागील हंगाम अप्रतिम गेला होता. सामन्याची सुरुवात म्हणून त्याने स्ट्राईक घेतली मात्र मोहम्मद शमीच्या पहिल्याच चेंडू त्याच्या पॅडवर आदळला आणि एलबीडब्ल्यूची अपील झाली. अंपायरने मात्र याला नकार दर्शवला. हार्दिकने डीआरएसची मागणी केली आणि लखनऊचा कर्णधार गोल्डन डकवर परतला.

पहिल्या सामन्यातील पहिल्याच चेंडूवर के एलला माघारी परतावे लागले आहे. एकूणच या दोन्ही नवख्या संघाच्या सामन्याची रोमांचक सुरुवात झाली आहे. सामना सुरु होताच अवघ्या दोन मिनिटात विकेट पडल्याने क्रिकेट रसिकही गुजरातच्या कामगिरीने प्रभावित झाले आहेत.

महत्वाच्या बातम्या