मुंबई : इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघ गुरुवारी २३ जून रोजी लीसेस्टरशायरविरुद्ध सराव सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला. यात भारताचे चार खेळाडू लीसेस्टरशायरचे प्रतिनिधित्व करत आहेत. या सामन्यात भारत आणि मुंबई इंडियन्सकडून एकत्र खेळणारे दोन दिग्गज खेळाडू रोहित शर्मा आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह देखील आमनेसामने होते. रोहित भारतीय संघाचे नेतृत्व करत असताना बुमराह लीसेस्टरशायरकडून गोलंदाजी करत आहे.
सामन्यात एक घटना घडली. रोहित शर्मा स्ट्राइकवर असताना बुमराह त्याला गोलंदाजी करत होता. बुमराहने टाकलेला चेंडू अत्यंत वेगाने रोहितच्या हाताला लागला आणि तो विव्हळताना दिसला. यानंतर फिजिओला बोलवावे लागले. भारतासाठी आनंदाची बातमी म्हणजे रोहितला कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही.
— Mandeep (@VK__Goat18_) June 23, 2022
या सामन्यात भारताकडून रोहित शर्मा आणि शुबमन गिलने सलामी दिली. रोहित केवळ २५ धावा करून रोमन वॉकरच्या चेंडूवर बाद झाला. त्याचवेळी गिल या सामन्यात विशेष काही करू शकला नाही आणि २१ धावा करून बाद झाला. या सामन्यात ४ भारतीय खेळाडू लीसेस्टरशायरकडून खेळत आहेत. त्यात चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह आणि प्रसिध कृष्णाचा समावेश आहे. या सराव सामन्यानंतर भारत १ जुलैपासून इंग्लंडविरुद्ध कसोटी सामना खेळणार आहे. जिथे भारताचे नेतृत्व रोहित शर्माकडे असेल तर इंग्लंडचे नेतृत्व बेन स्टोक्सकडे असेल.
महत्त्वाच्या बातम्या –