VIDEO : ‘तुझ्या नजरेच्या ठिणगीणं वणवा पेटला’ ‘घुमा’चे पहिले गाणे प्रदर्शित

वेबटीम : महेश रावसाहेब काळे या नवख्या दिग्दर्शकाच्या पहिल्या आणि बहुप्रतीक्षित ‘घुमा’ चित्रपटातील पाहिलं गाण ‘वणवा पेटला’ हे प्रदर्शित झाले आहे.

या गाण्याचे बोल गीतकार गुरु ठाकूर यांचे असून सौरभ भालेराव , ऋषिकेश दातार आणि जशराज जोशी यांनी या गाण्याला संगीतबद्ध केल आहे तर सुप्रसिद्ध गायक अजय गोगावले यांच्या आवाजाने या गाण्याला चार चांद लावले आहेत.

ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेचे वास्तव दाखवणारा हा चित्रपट येत्या २९ सप्टेंबर ला महाराष्ट्र भर प्रदर्शित होत आहे.
ग्रामीण भागातील या वास्तवदर्शी चित्रपटासाठी मराठी चित्रपटसृष्टी मधील दिग्गज कलाकारांची साथ लाभत असल्याने त्यांचे आभार मानावे तितके थोडेच असल्याच मत चित्रपटाचे कार्यकारी निर्माते मंगेश जोंधळे यांनी व्यक्त केलय.

You might also like
Comments
Loading...