VIDEO : पुण्यामध्ये अशा होणार गणेश विसर्जन मिरवणुका ; हे असणार वाहतुकीतील बदल

पुणे : मागील गेल्या 11 दिवस गणेश भक्त गणपती बाप्पाची मनोभावे आराधना करत होते आणि शेवटी तो दिवस उद्या उजाडत आहे. ऊद्या बाप्पांचं विसर्जन होणार आहे. त्यामुळे पुण्यातील पाच मानाच्या गणपतींची भव्य विसर्जन मिरवणुकीची तयारी पूर्ण झाले आहे.

त्याचप्रमाणे उद्या होणाऱ्या भव्य विसर्जन मिरवणुकीसाठी गणेश भक्त लोखोंच्या संख्येने पुण्यात दाखल झाले आहेत. राज्यातुनच नव्हे तर देशाच्या विविध भागातून भक्त पुण्यात आले आहेत. पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूकीकडे संपूर्ण जागाच लक्ष लागेल असत. मोठ्या संखेत भाविक या मिरवणुकीत सहभागी होतात त्यामुळे या दिवशी शहरातील वाहतूक व्यवस्थेत काही बदल करण्यात आले आहेत.