Video- कंपन्यांकडून शेतकऱ्यांना एक दमडाही मदत मिळणार नाही- शरद पवार

औरंगाबाद – मराठवाड्यात कापूस हे महत्त्वाचे पीक आहे. बोंडअळीमुळे हे पीक उद्ध्वस्त झाले. राज्य सरकारने जे मदतीचे पत्रक काढले ते मी वाचले. यात बियाणाच्या कंपन्या मदत करणार असे सांगितले आहे. मी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो कंपन्यांकडून एक दमडाही मदत मिळणार नाही. अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला.

विभागीय आयुक्त कार्यालयासमोर राष्ट्रवादीची हल्लाबोल यात्रेची सांगता सभा सुरु आहे. हल्लाबोल यात्रेच्या सभेत राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांच्यासह राष्ट्रवादीच्या प्रमुख दिग्गजांनी हजेरी लावली. तसेच औरंगाबाद शहरातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि नेत्यांनी देखील या सभेला मोठ्या संख्येने हजेरी लावली.

शरद पवारांचा सरकारवर ‘हल्लाबोल’

केंद्र सरकारने अर्थसंकल्पात शेती उत्पादनावर दीडपट भाव देणार असं सांगितले तरी उत्पादन खर्चाची व्याख्याच बदलण्याचे काम सरकारने केले आहे. त्यामुळे कशाच्या आधारावर हमीभाव देणार? कर्जमाफी जशी लबाडा घरचं आवतण होती तसंच हे आश्वासन आहे.मराठवाड्यात कापूस हे महत्त्वाचे पीक आहे. बोंडअळीमुळे हे पीक उद्ध्वस्त झाले. राज्य सरकारने जे मदतीचे पत्रक काढले ते मी वाचले. यात बियाणाच्या कंपन्या मदत करणार असे सांगितले आहे. मी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो कंपन्यांकडून एक दमडाही मदत मिळणार नाही.

You might also like
Comments
Loading...