इराणी करंडकावर दुसऱ्यांदा कोरले गेले विदर्भाचे नाव

blank

टीम महाराष्ट्र देशा : शेष भारत वि. विदर्भ झालेल्या इराणी करंडकाच्या अंतिम सामन्यात विदर्भाने बाजी मारली आहे. सलग दुसऱ्यांदा रणजीपाठोपाठ इराणी करंडकावर विदर्भाने आपले नाव कोरले आहे. या सामन्यात शेष भारताकडून २८० धावांचे आव्हान ठेवण्यात आले होते. पण विदर्भाच्या मधल्या फळीच्या फलंदाजांच्या संयमी खेळने हे आव्हान विदर्भाने सहजच गाठले.

शेष भारताकडून ठेवण्यात आलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना विदर्भाला सुरवातीला जड गेले. कारण पहिल्याच षटकात विदर्भाचा फैझ फझल हा सलामीवीर बाद झाला. पण त्यानंतर आलेल्या संजय रामास्वामी आणि अथर्व तायडे यांनी संयमी खेळी खेळत दुसऱ्या विकेटसाठी ११६ धावांची भागीदारी केली. राहुल चहारने रामास्वामीला बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर अथर्व देखील बाद झाला.

हे दोन्ही सेट फलंदाज बाद झाल्यानंतर शेष भारताला सामन्यावर ताबा मिळवता आला असता पण शेष भारताच्या गोलंदाजाना विदर्भाच्या फलंदाजांवर दबाव निर्माण करण्यात अपयश आले. गणेश सतिश याने शेष भरताच्या गोलंदाजाना खोडून काढत संघाला सामन्यावर पकड मिळवून दिली.

दरम्यान या सामन्यात संजय रघुनाथने ४२, अथर्व तायडेने ७२, आणि गणेश सतीश याने ८७ धावा केल्या. तर शेष भारता कडून राहुल चहर याने २ विकेट , तर अंकित , जडेजा , आणि हनुमा विहारी यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.