वेगळं विदर्भ राज्य झाल्यावरच विदर्भाला न्याय मिळेल- आठवले

blank

टीम महाराष्ट्र देशा- स्वतंत्र विदर्भाची मागणी न्यायोचित असून त्यास आपला पाठींबा आहे. आघाडी सरकारच्या काळात स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी भाजपच आघाडीवर होते. विदर्भ राज्य वेगळा झाल्यावरच विदर्भाला न्याय मिळेल. त्यासाठी भाजपने पुढाकार घेण्याची गरज असल्याचे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलं आहे.

अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनासाठी अर्जुनी/मोरगाव येथे आठवले आले होते. त्यानंतर भंडारा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. वेगळ्या विदर्भाच्या मागणीला रिपब्लिकन पक्षाचा पाठींबा असल्याचं सांगताना आठवले यांनी भाजपला घरचा आहेर सुद्धा दिला राज्यात भाजपचे सरकार असले तरी विदर्भावरील अन्याय दूर झाला नाही असा चिमटा काढत वेगळ्या विदर्भासाठी भाजपने पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचं त्यांनी म्हटलं आहे .