विदर्भाच्या पोट्ट्यांनी रणजीची फायनल मारली बे !…

विदर्भाने दिल्लीला ९ गडी राखून नमवलं

टीम महाराष्ट्र देशा : विदर्भाने आज पहिल्यांदाच रणजी सामन्याची अंतिम फेरी गाठली. विदर्भाने आज इंदूरच्या होळकर मैदानावर विक्रमांचा पाऊस पाडला. रणजी करंडकाच्या अंतिम फेरीत विदर्भाने दिल्लीवर ९ गडी राखून मात केली. विदर्भासमोर दुसऱ्या डावात विजयासाठी अवघ्या २९ धावांच आव्हान होत. हे आव्हान विदर्भाच्या फलंदाजांनी पार केलं.

दुसऱ्या डावात अक्षय वाखरे आणि आदित्य सरवटेच्या माऱ्यासमोर दिल्लीला झुकावाच लागल. ध्रुव शौरी आणि नितीश राणा यांनी तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचत विदर्भाचा विजय लांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचे प्रयत्न अखेर अपुरे पडले.

विदर्भाचा डाव ५४७ धावांमध्ये संपवण्यात चौथ्या दिवसाचा खेळ सुरु झाल्यानंतर दिल्लीला यश आलं. मधल्या फळीत अक्षय वाडकरने केलेली शतकी खेळी आणि त्याला आदित्य सरवटे, सिद्धेश नेरळ आणि अनुभवी वासिम जाफरने दिलेली साथ या जोरावर विदर्भाने पहिल्या डावात २५२ धावांची आघाडी घेतली.

अखेर दिल्ली ने विदर्भाच्या गोलांदाच्या भेदक माऱ्यासमोर शरणागती पत्करली आणि विजयासाठी अवघ्या २९ धावांचं आव्हान दिलं. विदर्भाने हे आव्हान सहज रित्या पार करत विजय रथ खेचून आणला. चंद्रकांत पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या विदर्भाच्या संघाने सर्वांचे अंदाज खोटे ठरवत आपलं पहिलं  रणजी विजेतेपद पटकावलं.

You might also like
Comments
Loading...