विदर्भ बंदला अत्यल्प प्रतिसाद

vidarbha

टीम महाराष्ट्र देशा – स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी विविध विदर्भवादी संघटनानी माजी आमदार वामन चपत व राम नेवले यांचा नेतृत्वाखाली अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विदर्भ बंद आंदोलन केले. मात्र या आंदोलनाला विदर्भात संमिश्र प्रतिसाद मिळाला. काही ठिकाणी कार्यकर्त्यांनी बस तोडफोड तसेच जाळपोळ वगळता अन्य ठिकाणी जनजीवन शांततेत सुरु होते. शाळा, महाविद्यालये, दुकाने, बाजारपेठ, शासकीय ऑफिसेस सुरळीत सुरु होते. शहरात काही ठिकाणी कार्यकर्ते व व्यापारी यांचामध्ये वादावादी झाली. यावेळी काही नेते व कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.