विदर्भ अन् मराठवाड्यात ‘गुलाब’ करणार कहर; तुफान पावसाची शक्यता

विदर्भ अन् मराठवाड्यात ‘गुलाब’ करणार कहर; तुफान पावसाची शक्यता

vidarbh

मुंबई : गुलाब चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या उत्तर आणि ओडिशाच्या दक्षिण किनारपट्टीवर धडकले आहे. हवामान खात्याने रविवारी ही माहिती दिली. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे रविवारपासून दक्षिण आणि किनारपट्टी भागात पाऊस सुरू झाला आहे. या चक्रीवादळाचा परिणाम राज्यावर देखील होणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांसह मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज असल्याने हवामान खात्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. विदर्भ, मराठवाड्यात आज मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. वाऱ्यांचा वेग ताशी 30 ते 40 किमी आहे. तसेच, उद्या 28 रोजी मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मुंबईतही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तेथेही वाऱ्याचा वेग 30 ते 40 किमी असणार आहे.

कोकणाच्या किनारपट्टीवर मासेमाऱ्यांसाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच, पुढील 3 दिवस समुद्रात न जाण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत, असे हवामान खात्याच्या अधिकारी शुभांगी भुते यांनी सांगितले आहे. गुलाब’ चक्रीवादळामुळे महाराष्ट्रामध्ये दोन दिवस मुसळधार पाऊस शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

पुण्याच्या परिसरातील घाटमाथ्यावर पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर पुढील तीन तासात जोरदर पाऊस होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे घाटमाथ्यावर आज आणि उद्या पावसाचा ‘रेड अलर्ट’ दिल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या