विधान परिषदेवर झालेला दणदणीत विजय शिवसेनेला चपराक! – सुनील तटकरे

sunil tatkare

टीम महाराष्ट्र देशा: “आम्ही आजवर विनम्रपणे राजकारण करत आल्याचे आजचा विजय हे फलित आहे. हा समविचारी पक्षांचा विजय आहे. आज अनिकेत तटकरे यांचा स्थानिक स्वराज्य संस्थांतून शिवसेनेची मते फोडत विधान परिषदेवर झालेला दणदणीत विजय हा सेनेला एकप्रकारे चपराक आहे”, असे सुनील तटकरे यांनी शिवसेनेला टोले लगावले.

दरम्यान, तटकरे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, स्वाभिमानी पक्षाचे नारायण राणे, शेकापचे जयंत पाटील, काँग्रेसचे अशोक चव्हाण आणि मनसेचे राज ठाकरे यांचे आभार मानले.

Loading...

महाराष्ट्र राज्यात झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून ५ जागांचे निकाल हाती आले आहेत. यामध्ये भाजपा व शिवसेना प्रत्येकी २ जागावर विजयी झाले असून राष्ट्रवादी १ जागेवर निवडून आले आहे. विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील शिवसेना उमेदवार नरेंद्र दराडे यांनी दणदणीत विजय मिळवला आहे.

दराडे यांनी राष्ट्रवादीचे शिवाजी सहाणे यांचा पराभव केला आहे. नरेंद्र दराडे यांना पाडण्याचे विरोधकांचे सारे प्रयत्न हाणून पाडत शिवसेनेवरील विश्वास कायम असल्याचे या निवडणुकीत दाखवून दिले आहे. यावेळी दराडे यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली होती. शिवसेना उमेदवार नरेंद्र दराडे यांना ४१२ मते पडली असून त्यांनी राष्ट्रवादी उमेदवार शिवाजी सहाणे (२१९ मते) यांचा १९३ मतांनी पराभव केला.

परभणी-हिंगोलीतून शिवसेनेचे विप्लव बाजोरिया यांना २५६ मत पडली त्यांनी काँग्रेसचे सुरेश देशमुख (२२१ मत) यांचा ३५ मतांनी पराभव केला. विदर्भात कमळ उमललं असून विधान परिषदेच्या वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये भाजपाचे रामदास आंबटकर हे विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसच्या इंद्रकुमार सराफ यांना पराभूत केलं. भाजपाचे रामदास आंबटकर यांना ५५० मत मिळाली त्यांनी काँग्रेसचे इंद्रकुमार सराफ (४६२ मत) यांचा ८८ मतांनी पराभव केला.

अमरावती मतदारसंघातून भाजपाचे विद्यमान राज्यमंत्री प्रवीण पोटे निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यांनी देखील काँग्रेसचे अनिल मधोगरिया यांना पराभूत करत भाजपचं कमळ फुलवलं आहे. प्रविण पोटे-पाटील (४५८ मत) यांनी काँग्रेसचे अनिल मधोगरिया (१७ मत) यांचा ४४१ मतांनी पराभव केला. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग कोकण विधानपरिषद निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत सुनील तटकरे(४२१) विजयी झाले त्यांनी शिवसेनेच्या राजीव साबळेंचा(२२१) २०० मतांनी पराभव केला. नारायण राणेंच्या पाठिंब्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार अनिकेत तटकरे विजयी झाले.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

संज्याचं तोंड येरंडेल घेतल्यासारखं झालं असेल : निलेश राणे
दोस्ती तुटायची नाय : शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे पालिकेत भाजपचा महापौर
राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील 'त्या' टिकेला अजितदादांचे रोखठोक प्रत्युत्तर, म्हणतात...
धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का
राष्ट्रवादीची गुंडगिरी : भाजपने केला सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल
यापेक्षा अधिक लोक तर गुरूद्वारामध्ये रोज लंगरमध्ये जेवतात, तेही मोफत
सोनियाजींनी सांगितलं शिवसेनेकडून पहिलं हे लिहून घ्या की ...चव्हाणांचा खळबळजनक दावा
करोना आजार होऊ नये याकरिता दक्षता घेण्याबाबत पुणे मनपाचे आवाहन
संजय राऊत म्हणतात, महाराष्ट्रात केवळ दोनच विठ्ठल
'उद्धव ठाकरे अनुभवशून्य मुख्यमंत्री; महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे'