‘सत्याचा विजय’, न्यायालयाच्या निकालावर खासदार नवनीत राणा यांची प्रतिक्रिया

अमरावती : मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना दिलासा मिळाला आहे. एक महिला राज्याचे प्रश्न लोकसभेत मांडते, उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आवाज उठवते, त्यामुळे माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला होता. मात्र, आता सत्याचा विजय झाला असल्याचे मत खासदार राणा यांनी व्यक्त केलंय.

निवडणूक आयोगाच्या वतीने माझे जात वैधता प्रमाणपत्र आधीच तपासण्यात आले होते. ते खरे असल्यानेच मला निवडणुकीला उभे राहता आले. मात्र, माझ्या विरोधात उभे असलेले ज्येष्ठ नेते यांचा जनतेने पराभव केला. त्यामुळेच त्यांनी माझ्या विरोधात हा कट रचला असल्याचे खासदार राणा म्हणाल्या. शिवसेनेचे नेते आनंदराव अडसुळ यांचे नाव न घेता खासदार राणा यांनी त्यांच्यावर टीका केली.

खासदार राणा यांचे जात प्रमाणपत्र मुंबई उच्च न्यायालयाने नुकतेच रद्द केले होते. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये पुनर्विचार याचिका दाखल केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला निकाल हा अन्यायकारक आहे, दाखल केलेल्या विशेषाधिकार याचिकेअंतर्गत उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे निरीक्षण करण्याची मागणी त्यांनी याचिकेतून केली होती. यामध्ये राणा यांना दोन लाख रुपयांचा दंड ठोठावल्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP