पंतप्रधानांचे नेतृत्व आणि विकासाच्या मुद्याचा विजय – रावसाहेब दानवे

मुंबई : भारतीय जनता पार्टीने गुजरात व हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत मिळवलेला विजय हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व आणि भाजपाने सातत्याने मांडलेला विकासाचा मुद्दा यांचा विजय आहे. या विजयाबद्दल आपण पंतप्रधान मोदी, भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि दोन्ही राज्यातील भाजपाच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांनी सोमवारी सांगितले.

bagdure

खा. रावसाहेब पाटील दानवे म्हणाले की, भाजपाने सातत्याने निवडणुकीत विकासाचा मुद्दा मांडला. परंतु विरोधकांनी हा मुद्दा डावलण्यासाठी जातीयवादावर भर दिला. पण गुजरातच्या मतदारांनी जातीयवादाला स्पष्ट नकार दिला, विकासाचा मुद्दा मान्य केला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला जोरदार पाठिंबा दिला.

भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी देशभर पक्षाची संघटना बळकट करण्यासाठी परीश्रम केले आहेत. गुजरातमध्येही त्यांनी बूथपातळीपर्यंत मजबूत पक्ष संघटना उभी केली. भाजपाच्या केंद्र व राज्य सरकारचे काम तसेच पक्ष संघटनेचा प्रभाव यामुळे हा विजय मिळाला आहे. विकास हाच राजकारणाचा मुख्य मुद्दा आहे, हे या निकालांनी सिद्ध केले आहे.

You might also like
Comments
Loading...