न्यूयॉर्क : बॉलिवूड अभिनेता विकी कौशल याने नुकताच ३५ वा वाढदिवस साजरा केला आहे. लग्नानंतर विकीचा हा पहिलाच वाढदिवस आहे. हा वाढदिवस विकीने पत्नी कतरिना सोबत साजरा केला आहे. हा खास दिवस न्यूयॉर्कमध्ये साजरा केला आहे. वाढदिवस साजरा करताना विकीसोबत त्याची पत्नी आणि काही जवळचे लोक दिसले. अभिनेत्याने या खास दिवसांचे फोटो सोशल मिडीयावर देखील शेअर केले.
विकीने त्याच्या इंस्टाग्रामवरून वाढदिवसाचे काही खास फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहे. फोटो शेअर करत अभिनेत्याने कॅप्शन मध्ये लिहिले आहे की, तुमच्या आवडत्या लोकांसोबत नवीन वर्षात प्रवेश करत आहे. मला प्रेम आणि शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद.
यामध्ये विकी आणि कतरिना केक कापताना दिसत आहेत. केक कापत असताना विकी निळ्या रंगाच्या टी- शर्टमध्ये आणि कतरिना कतरिना पांढऱ्या रंगाच्या पोशाखात आहे. हे दोघेही या कपड्यांमध्ये खूप सुंदर दिसत आहेत.
विकीने शेअर केलेल्या पोस्टवर चाहते आणि इंडस्ट्रीतील विकीचे मित्र अभिनंदन करत आहेत. शेअर केलेला फोटो सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे. याआधी अभिनेत्री कतरिना कैफने पती विकी कौशलच्या वाढदिवसानिमित्त न्यूयॉर्कमधील स्वतःचे काही फोटो शेअर केले होते. हे फोटो शेअर करत कतरिनाने कॅप्शन मध्ये लिहिले की, न्यूयॉर्क वाला बर्थडे माय लव्ह. यावेळी याच पोस्टवर कमेंट करत विकी म्हणाला, ‘बर्थडे मॅरीड.’
विकी आणि कतरिना हे दोघेही त्यांच्या कामामध्ये व्यस्त आहेत. अभिनेत्री सध्या विजय सेतुपतीसोबत मेरी ख्रिसमससाठी शूटिंग करत आहे. याशिवाय ती सलमान खानसोबत टायगर 3 या चित्रपटात दिसणार आहे. विकी देखील लक्ष्मण उतेकर यांच्या एका चित्रपटात काम करत आहे.
महत्त्वाच्या बातम्या :