आईला नाहीतर अफजल गुरूला सलाम करणार का ? व्यंकय्या नायडू

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी वंदे मातरमला विरोध करणारांचा घेतला खरपूस समाचार

नवी दिल्ली : विश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक सिंघल यांच्या पुस्तक प्रकाशन समारंभात बोलताना उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी वंदे मातरमला विरोध करणारांचा खरपूस समाचार घेतला.वंदे मातरम् म्हणजे आई तुला वंदन, जर तुम्ही आईला वंदन नाही करणार तर अफझल गुरुला करणार का? असा संतप्त प्रश्न व्यंकय्या नायडू यांनी विचारला आहे.

काय म्हणालेत व्यंकय्या नायडू

जर एखादा भारतीय भारत माता की जय म्हणत असेल तर ते कोणत्या देवाबद्दल नसतं. ते जात, रंग, पंथ किंवा धर्माबाबत नसून देशातील 125 कोटी लोकांबाबत असतं.वंदे मातरम् म्हणजे आई तुला वंदन, जर तुम्ही आईला वंदन नाही करणार तर अफझल गुरुला करणार का? हिंदू हा धर्म नाही तर जगण्याची पद्धत आहे. हिंदू धर्म एक संकुचित संकल्पना नाही, तो भारताचा एक व्यापक सांस्कृतिक अर्थ आहे. हिंदू धर्म भारताची संस्कृती आणि परंपरा आहे, जी पिढ्यानपिढ्या सुरु आहे,काही धर्मांध नेत्यांचा वंदेमातरम म्हणायला विरोध असल्याचा आरोप ही व्यंकय्या नायडू यांनी केला.