मंजुळे यांना चित्रपटाच्या शूटिंगसाठी मैदान दिल्याचा कुलगुरूंना पश्चाताप,कुलगुरूंनी व्यक्त केली दिलगिरी

चित्रपट सेटप्रकरणी विद्यापीठाचे नुकसान झाल्याने कुलगुरूंची दिलगिरी

पुणे : सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठाचे मैदान दिगदर्शक नागराज मंजुळे यांना चित्रपटाच्या शूटिंगसाठी भाड्याने देण्याची संपूर्ण जबाबदारी मी स्वीकारतो, हा प्रयोग फसला. याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो असे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी सांगितले.

दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी मैदान भाड्याने दिल्याने विद्यापीठाचे १४ कोटी ४० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे वृत्त समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती.या वृत्ताची दखल घेऊन सिनेटमध्ये संतोष ढोरे यांनी स्थगन प्रस्ताव मांडला.सिनेट सदस्यांनी यावर तीव्र भावना व्यक्त केल्यानंतरे कुलगुरूंनी दिलगिरी व्यक्त केली आहे .

शुटिंगसाठी मैदान दिल्याने माजी सिनेट सदस्य नाराज