व्हिटोरीच्या मते टीम इंडियातील ‘हा’ खेळाडू आहे सर्वात घातक

नवी दिल्ली : शनिवारी मँचेस्टर येथे पार पडलेल्या क्रिकेट सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेणाऱ्या दक्षिण आफ्रिका संघाने ऑस्ट्रेलियाचा १० धावांनी पराभव केला. परिणामी श्रीलंकेवर मात करणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाने गुणतालिकेत प्रथम स्थान मिळवलं आहे. यामुळे भारताचा सेमीफायनलमध्ये सामना ९ जुलैला निश्चित झाला असून चौथ्या क्रमांकावर असलेल्या न्यूझीलंडसोबत पुन्हा टक्कर होणार आहे.

या सामन्याबाबत अनेक तज्ञ मंडळी मत व्यक्त करत असून न्यूझीलंडचा माजी दिग्गज अष्टपैलू खेळाडू डॅनियल व्हिटोरी याने देखील या सामन्याबाबत भाष्य केलं आहे. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सर्वोच्च फॉर्मात आहे. सध्या त्याची गोलंदाजी खेळणे जवळपास अशक्य आहे. त्यामुळे त्याच्यापासून सावध रहा, असा सल्ला डॅनियल व्हिटोरी याने दिला आहे.

व्हिटोरी म्हणाला, ‘बुमराहची गोलंदाजी खेळणे सध्या अशक्यप्राय झाले आहे. उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा सामना टीम इंडियाशी होणार आहे, त्यामुळे त्यांना सर्वाधिक खतरा बुमराहपासूनच आहे. बुमराहविरोधात रणनिती आखून आक्रमकपणे खेळावे लागेल. त्याला एक जरी संधी मिळाली तर तो विरोधी संघावर तुटून पडेल.’Loading…
Loading...