अण्णा हजारे उपोषणाला बसणार  

राळेगणसिद्धी: ज्येष्ठ समाजसेवक आणि माजी सैनिक अण्णा हजारे महाराष्ट्र शासनाच्या विरोधात उपोषणाला बसणार आहेत. महाराष्ट्र सरकारच्या किराणा दुकानात वाईन विक्रीच्या निर्णयावरून राज्यात सध्या वादंग सुरू आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी महाराष्ट्र सरकारला उपोषणाचा ईशारा दिला आहे.

गेल्या महिनाभरापासून राज्यात सुरूअसलेला वाईन विक्री निर्णय सध्या मोठ्या चर्चेत आला आहे. भाजप पक्षाने त्यावर सडकून टीका करत निर्णय मागे घेण्याची मागणी महाविकास आघाडी सरकारला केली आहे. आता लोकपाल विधेयक देशात लागू करण्यासाठी २०११ साली देशात मोठे आंदोलन उभे करत मनमोहन सिंह सरकार विरुद्ध उपोषण करणारे अण्णा हजारे या नवीन उपोषणाला बसणार आहेत.  अशी माहिती त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. अण्णा हजारे यांनी त्यासंबंधी महाविकास आघाडी सरकारला पत्र पाठवून सूचित केले आहे.

 महत्वाच्या बातम्या: