शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पवारांसह दिग्गज नेते हजर मात्र शिवसेनेचा एकही नेता फिरकला नाही !

uddhav thakre

मुंबई : कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात आता महाराष्ट्राचे शेतकरी ही सामिल झाले आहेत. राज्याच्या २१ जिल्ह्यांचे शेतकरी नाशिकहून मुंबई म्हणजेच १८० किलोमीटरपर्यंत रॅली काढत मुंबईत दाखल झालेआहेत. आज शेतकरी आंदोलनानिमित्त आझाद मैदानात संयुक्त शेतकरी आंदोलनाची सभा पार पडल्यानंतर आता पायी मोर्चा घेऊन राजभवनाच्या दिशेने निघाले आहेत.

या मोर्चाला पोलिसांनी अडवलं आहे. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांनी शेतकरी आंदोलनास पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, इतर शेतकरी संघटनांचे नेते व मंत्री हजर राहिले असतानाच शिवसेनेच्या एकही नेत्याने वा मंत्र्याने या मोर्चाला हजेरी लावलेली नाही.

त्यामुळे शिवसेनेचा या आंदोलनाला शाब्दिक पाठींबा असला तरी प्रत्यक्षरित्या शिवसेनेचा सहभाग या आंदोलनात नसल्याचं समोर आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वा इतर शिवसेनेचे मंत्री हे या आंदोलनातील सभेला हजर राहतील अशा चर्चा सुरु होत्या. मात्र, शिवसेनेच्या नेत्यांनी हजेरी न लावल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे नियोजित कार्यक्रमासाठी गोव्याला गेले असल्याने या मोर्चाला पोलिसांनी अडवले आहे.

महत्वाच्या बातम्या