जे संघाच्या शाखेत जात नाहीत, ते हिंदूच नाहीत भाजप आमदाराने तोडले अकलेचे तारे

टीम महाराष्ट्र देशा: शाखा या देशाच्या हितासाठी काम करतात. शाखेत सहभागी होणारी व्यक्ती ही देशाच्या आणि धर्माच्या हितासाठी काम करते. जे शाखेत जात नाहीत, ते हिंदूच नाहीत अस बेताल वक्तव्य हैदराबादमधील भाजपा आमदार टी राजा सिंह यांनी केल आहे. नीमचजवळ हिंदू उत्सव समितीने धर्म सभेचे आयोजन केले होते. या सभेत संबोधित करताना टी राजा सिंह यांनी हे अकलेचे तारे तोडले आहेत.

आता या विधानावर कॉंग्रेसने जोरदार टीका केली आहे. हिंदू कोण आहे आणि कोण नाही हे ठरवण्याचा अधिकार राजा आणि साक्षी महाराजांना नाही. हिंदू कुटुंबात जन्मलेल्या व्यक्तीला तो हिंदू हे सिद्ध करण्यासाठी संघाच्या प्रमाणपत्राची गरज नाही, तर भारतातील एक टक्का हिंदू देखील या शाखांमध्ये जात नाही, अशी टीका हैदराबादमधील युवक काँग्रेसचे नेते रमेश राजोरा यांनी केली आहे.

You might also like
Comments
Loading...