‘अतिशय भयंकर आणि संतापजनक; अत्याचारांच्या प्रकरणामुळे चीड येतेय’, फडणवीसांचा संताप

‘अतिशय भयंकर आणि संतापजनक; अत्याचारांच्या प्रकरणामुळे चीड येतेय’, फडणवीसांचा संताप

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात घडत असणाऱ्या घटनांमुळे राज्यात महिला सुरक्षित आहेतकी नाहीत असा प्रश्न वारंवार उपस्थित होत आहे. पुण्यातील अल्पवयीन मुलीवर किमान १५ जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना ताजी असतानाच ठाणे जिल्ह्यातूनही हादरवून टाकणारी बातमी समोर आली आहे. १४ वर्षीय मुलीवर गँगरेप झाल्याची घटना डोंबिवलीतील भोपर परिसरात समोर आली आहे. प्रियकराने बलात्काराचे व्हिडीओ शूट करत ब्लॅकमेल केल्यानंतर जवळपास ३० नराधमांनी अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

या घटनेवरून विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त केला आहे. ‘अतिशय भयंकर आणि संतापजनक ही घटना आहे. महिला अत्याचाराची सातत्याने वाढणारी ही प्रकरणे चीड आणणारी आहेत. राज्य सरकारने तत्काळ आणि गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

‘अतिशय भयंकर आणि संतापजनक! डोंबिवलीच्या भोपरमध्ये १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ३० जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना ऐकून मन सुन्न झाले. महिला अत्याचाराची सातत्याने वाढणारी ही प्रकरणे चीड आणणारी आहेत. डोंबिवलीसारख्या भागात अशी घटना अतिशय गंभीर आहे. यातील आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे. आरोपींना जरब बसेल आणि अशा घटना पुन्हा घडणार नाहीत, यासाठी राज्य सरकारने आतातरी तातडीने आणि गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे’ असे म्हणत फडणवीस यांनी ट्विटद्वारे निषेध व्यक्त केला आहे.

काय आहे घटना?
डोंबिवलीत १४ वर्षीय मुलीवर झालेल्या अत्याचाराने एकच खळबळ उडाली आहे. तब्बल ३० जणांनी तिच्यावर गेल्या ८ महिन्यात वेगवेगळ्या ठिकाणी बलात्कार केल्याचा आरोप पिडीत मुलीने केला आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री गुन्हा दाखल होताच मानपाडा पोलिसांच्या चार पथकांनी २३ आरोपींना अटक करत पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यातील दोन आरोपी हे अल्पवयीन आहेत. भोपर गावात राहणाऱ्या पीडित मुलीवर दोन दिवसापूर्वी बलात्कार झाला. तिला त्रास होऊ लागल्याने तिने याविषयी आईला सांगताच आईने घरच्यांना कल्पना देत मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली.

महत्वाच्या बातम्या