भुजबळ आणि शिवसेना आमदारामध्ये खडाजंगी; नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक तर समर्थकांची घोषणाबाजी

bhujbal vs shivsena

नाशिक : नाशिक जिल्ह्यात पावसाने कहर माजवल्यामुळे गंभीर पूरस्थिती निर्माण झाली होती. नुकसानग्रस्तांना आपत्कालीन निधीतून मदत मिळावी अशी मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ हे नुकसानग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहेत. मात्र यावेळी छगन भुजबळ आणि शिवसेना आमदार सुहास कांदे यांची जोरदार खडाजंगी झाली.

या दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याचे पाहायला मिळाले. तर कांदे समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली. तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीदरम्यान पूरग्रस्तांना देण्यात येणाऱ्या मदतीवरून वादावादी झाली. सुहास कांदे यांनी उत्तर महाराष्ट्रातील पूरग्रस्त निधीवरुन तात्काळ मदतीची मागणी केली. ज्याप्रमाणे सांगली-कोल्हापूरच्या महापुरावेळी मदत दिली होती, तशीच तात्काळ मदत मिळावी अशी मागणी त्यांनी केली. यावेळी भुजबळांनीही तशीच मदत दिली जाईल असा शब्द दिला. मात्र, या दरम्यान दोन्ही नेत्यांचा पारा चढला आणि वादावादी झाली. याबाबत एका वृत्तवाहिनीने वृत्त दिले आहे.

अगदी दोन्ही नेते तहसील कार्यालयातून बाहेर पडेपर्यंत एकमेकांवर शाब्दिक वर करत असल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, आता भुजबळ त्यांच्या दौऱ्यानंतर महाराष्ट्र शासनाकडून किती आणि कधीपर्यंत मदत आणणार याकडे नुकसानग्रस्तांचे लक्ष लागले आहे.

महत्त्वाच्या बातम्या