व्यंकय्या नायडूंनी दाखल केल उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी अर्ज

वेबटीम : भाजप नेते व्यंकय्या नायडू यांनी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.  काल भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी नायडूंच्या नावावर शिक्कामोर्तब केल्यानंतर आज नायडूंनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

व्यंकय्या नायडूं यांची लढत यूपीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार  गोपाळकृष्ण गांधी यांच्याशी असणार आहे. दरम्यान काल भाजपचे अध्यक्ष अमित शहांनी उपराष्ट्रपतीपदासाठी नायडूंच्या नावाची घोषणा केल्यानंतर नायडूंनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला. हे खाते स्मृर्ति इराणी संभाळणार आहेत