औरंगाबाद मध्ये राबणार ‘वेंगुर्ला पॅटर्न’

कचरा समस्येवर तोडगा काढण्यासाठी वेंगुर्लाचे मुख्याधिकारी रामदास कोकारे यांना औरंगाबादचा अतिरक्त प्रभार

औरंगाबाद: गेल्या २२ दिवसांपासून शहरात कचरा समस्या आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी वेंगुर्लाचे मुख्याधिकारी रामदास कोकारे यांना औरंगाबादचा अतिरक्त प्रभार देण्यात आला आहे. औरंगाबादला स्वच्छ व सुंदर बनवण्यासाठी, शहरातील कचऱ्याची समस्या कायमस्वरुपी सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे. औरंगाबादेत तातडीने काम सुरू करण्यासाठी रामदास कोकारे औरंगाबादेत दाखल झाले असून त्यांनी सोमवारी अगदी सकाळपासूनच कामाला सुरुवातही केली आहे.

वेंगुर्ला शहराला काही वर्षांपूर्वी कचऱ्याच्या समस्येने वेढले होते. पण त्याठिकाणी रामदास कोकारे हे मुख्याधिकारी म्हणून रुजू झाले आणि त्यांनी शहरातचा कायापालटच करून टाकला. त्यांनी प्रशासन आणि लोकसहभागातून कचरा व्यवस्थापनाचा आदर्श असा ‘वेंगुर्ला पॅटर्न’ तयार केला. वेंगुर्ला पॅटर्नमध्ये कचऱ्याचे ओला कचरा, सुका कचरा, प्लास्टीक आणि धातू किंवा काच अशा चार भागांत वर्गीकरण केले. त्यापैकी ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून मिथेन वायूची निर्मिती केली व त्यापासून वीज उत्पादन केले.

प्लास्टीकचा चुरा तयार करून त्यापासून काही ठिकाणी रस्ते तयार करण्याचा प्रयोग करण्यात आला. त्याशिवाय सुक्या कचऱ्यातून माती, राख वेगळी करून त्याचा खत तयार करण्यासाठी वापर केला. देशभरात या पॅटर्नचे कौतुक झाले. रामदास कोकारे यांनी राबवलेला हा पॅटर्न अनेक शहरांमध्ये स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनासाठी वापरण्यात आला आहे.

You might also like
Comments
Loading...