व्हॅलेंटाईन स्पेशल : ‘या’आहेत राजकारणातील मागील वर्षी चर्चेत राहिलेल्या नवरा बायकोच्या जोड्या

blank

पुणे : प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो’, असं अनेक वेळा म्हटलं जातं. विठूरायाला पण हा संसार चालवण्यासाठी रखुमाईची साथ हवी होती. त्याचप्रमाणे अनेक राजकारणी वक्तीच्या मागे पण त्यांच्या पत्नी समर्थपणे उभे आहेत, तर ह्याच त्या पाच जोड्या आहेत ज्या मागील वर्षी जास्त चर्चेत राहिल्यात.

शरद पवार आणि प्रतिभा पवार

राजकारणामध्ये कोणतीही गोष्ट घडली की त्या पाठीमागे शरद पवारा साहेबांचा हात असेल असा एक अलिखित नियमच आहे. पण शरद पवार यांच्या लग्नाची गाठ बांधण्यासाठी शरद पवारांचा नाही तर पवारांच्या जेष्ठ बंधूंचा हात होता.शरद पवार यांच्या बद्दल जाणून घेण्याची मराठी माणसाला कायम आस असते. शरद पवार यांच्या कठीण काळात त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार या त्यांच्या पाठीशी कायम उभ्या राहिलेल्या आपणास पहायला मिळतात .

अजित पवार यांनी जेव्हा उपमुख्यमंत्री पदाची शपथ देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत भल्या पहाटे जाऊन घेतली, तेव्हा त्यांना परत आण्यासाठी प्रतिभा पवार यांचा देखील हात असल्यचा बोल जात होत, या कारणाने हि जोडी जास्त चर्चेत राहील होती. राजकारणापासून लांब राहिलेल्या प्रतिभा पवार या त्यावेळी मात्र शरद पवारांन इतक्याच चर्चेत राहिल्यात होत्या.

देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस

नागपूरचे पुत्र व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिसायला शांत , निडर, कणखर, असले तरी कुठेना कुठे एक रोमांटीक हिरो त्यांच्यात ही दडला आहेच की ! याची ग्वाही खुद्द त्यांचा अर्धांगिनी अमृता फडणवीस यांनी एकदा दिली होती. वयाच्या अवघ्या 27 व्या वर्षी देवेंद्र नागपूरचे महापौर बनले. देशातील सर्वात तरूण महापौर म्हणूनही त्यांचा गौरव झाला होता. मुख्यमंत्र्यांच्या यशस्वी राजकारणामागे त्यांच्या पत्नी अमृता यांचा मोठा वाटा आहे.

पण नंतर पत्नी अमृता आणि शिवसेना यांच्यातील वादाबाबत ते जास्त चर्चेत होते. काही राजकीय पक्ष आणि कार्यकर्ते त्यांना खालच्या पातळीवर ‘ट्रोल’केलं होत. अमृता फडणवीस यांनी ट्विटच्या माध्यमातून शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर कडाडून टीका केली होती.

उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी उद्धव ठाकरेंचं नाव समोर येण्यामागे त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंचा मोलाचा वाटा आहे. रश्मी ठाकरे ह्या जरी प्रत्यक्ष राजकारणात सक्रीय नसल्या तरीही पडद्यामागे उद्धव ठाकरेंसोबत कायमच त्या कार्यरत असतात. शिवसेना कार्यकर्ते आणि आमदार त्यांचा उल्लेख दुसऱ्या माँ साहेब असा करतात. उद्धव ठाकरेंच्या प्रत्येक राजकीय डावपेचात अथवा प्रत्येक भूमिकेत रश्मी ठाकरेंचा मोठा वाटा असतो.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी प्रत्येक पावलावर उद्धव यांना साथ दिली. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे कार्याध्यक्ष ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या राजकीय प्रवासात रश्मी ठाकरे कायम खंबीरपणे त्यांच्या पाठिशी उभ्या राहिल्या. रश्मी ठाकरे यांचा राजकीय निर्णयांमध्ये किती सहभाग आहे हे ठाऊक नाही. पण शिवसेनेच्या कठीण काळात त्यांनी पक्षाला बांधून ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. आजही शिवसेनेच्या सर्व कार्यक्रमांमध्ये उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांचा वावर असतो.

रोहित पवार आणि कुंती मगर-पवार

रोहित पवार हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू आहेत. त्यामुळे त्यांना मोठा राजकीय वारसा आहे. कर्जत-जामखेडमधून निवडणूक लढवण्याची तयारी रोहित पवार यांनी सुरू केली आणि ते एकदम चर्चेत आले. पण या चर्चेला सुरुवात मात्र एका वेगळ्याच कारणानं झाली. खास गोष्ट म्हणजे रोहित पवार आणि त्यांची पत्नी कुंती मगर-पवार या दोघांचा एकाच दिवशी वाढदिवस असतो. आज माझ्यासोबत माझ्या पत्नीचा वाढदिवस असतो. त्यामुळे आजचा पूर्ण दिवस कुटुंबासाठी महत्त्वाचा असतो, असं रोहित यांनी फेसबुकवर प्रकाशित केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं केलं होत.

रोहित पवार हे खासगी आयुष्याबद्दल खूप कमी बोलतात, ते आपल्या कुटुंबाला प्रसिद्धीपासून दूरच ठेवतात. रोहित पवार हे पुण्यातील बांधकाम क्षेत्रातील प्रसिद्ध व्यावसायिक सतीश मगर यांचे जावई आहेत. त्यांच्या पत्नी कुंती यांनी नॉटिंगहॅम युनिव्हर्सिटीतून अर्थशास्त्र आणि गुंतवणूक या विषयांमध्ये पदवीचे शिक्षण घेतले आहे. रोहित-कुंती या दांपत्याला दोन मुलीही आहेत. ‘बाबा कुठे आहेत?’ या मुलांच्या प्रश्नाला एकदा रोहित यांनी सोशल मीडियावरून तूच आई आणि तूच बाबा या भूमिका निभावते, याबद्दल त्यांच्या पत्नीचे कौतुकही केले होते.

सुजय विखे पाटील आणि धनश्री सुजय विखे पाटील

महाराष्ट्रात सर्वाधिक चर्चेत असलेल्या अहमदनगर लोकसभा मतदारसंघात क्षणाक्षणाला मोठ्या घडामोडी सुरु होत्या. महाराष्ट्रातील युवा खासदारांमध्ये खासदार सुजय विखे पाटील यांच्या नावामुळे अहमदनगर लोकसभा मतदारसंघ नेहमीच चर्चेत असतो. सुजय यांच्या भाजप पक्ष प्रवेशावेळी विशेष चर्चेत राहिले. त्याच वेळी सुजय यांच्या सोबत माध्यमात झळकल्या त्या सौ. धनश्री सुजय विखे पाटील .

अहमदनगर लोकसभेच्या एकाच जागेसाठी आता पती आणि पत्नी असे दोघांनीही उमेदवारी अर्ज भरल्याची अनोखी घटना यामुळे घडली होती. अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असताना सुजय विखेंचा पत्नी धनश्री विखे यांनीही भाजपकडून अर्ज भरला होता. त्यामुळे अहमदनगर दक्षिण मतदारसंघातून भाजपकडून नेमकी कोणाला उमेदवारी मिळते याबाबत फारच उत्सुकता निर्माण झाली होती. पण निवडणूक आयोगाने सुजय विखे यांचा अर्ज वैध ठरवल्याने अखेर त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. आणि त्यांच्या पत्नी सुजय यांना समर्थपणे साथ दिली.

स्वभावाने शांत असलेल्या धनश्री सुरुवातीला फारशा ऍक्टिव्ह नव्हत्या. पण काही वर्षांनंतर मात्र त्यांच्या सासूबाई आणि अहमदनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शालिनी विखे पाटील यांच्या बचतगट विस्तारात देखील बऱ्यापैकी आहे. याशिवाय एक शाळाही चालवतात.