गाडी टोईंग करण्यापूर्वी द्यावी लागणार ध्वनीक्षेपकावरुन सूचना

मुंबई : मालाडमध्ये झालेल्या टोईंगच्या वादानंतर वाहतूक विभागाचे सहआयुक्त अमितेश कुमार यांनी टोईंगबाबत नवी नियमावली जारी केली आहे. गाडी टो करण्यापूर्वी ध्वनीक्षेपकावरुन गाडी काढण्यासाठी सूचनाही करण्यात येणार आहे. तसेच ध्वनिक्षेपकाचा आवाज ऐकून गाडी हटविल्यास गाडी चालकाला दंड भरावा लागणार नाही.

नव्या नियमावलीप्रमाणे प्रत्येक टोईंगच्या गाडीसोबत पोलीस उपनिरिक्षक दर्जाचा अधिकारीही असणार आहे. तसेच टोईंगच्या गाडीतील प्रत्येक अधिकाऱ्याकडे ई-चलन उपकरण आणि वॉकी-टॉकी देण्यात येणार आहे.