दुष्काळामुळे आवक घटल्याने ऐन लगीनसराईत भाजीपाल्याचे भाव कडाडले

तुळजापूर-राज्य दुष्काळात होरपळत असताना तुळजापूर तालुक्यास देखील दुष्काळाचे चटके बसु लागले आहेत.पाण्याची पातळी खोल गेल्याने पाण्याअभावी भाजीपाला शेती अडचणीत आली आहे. तुळजापूर तालुक्यात सरासरीचा पन्नास टक्के पाऊस झाल्याने याचा पहिला मोठा फटका शेती व्यवसायाला बसला आहे. पिण्याचा पाण्याबरोबरच शेतीलाही पाणीटंचाई प्रचंड जाणवत आहे.सध्या कोथींबीर लिंबू काकडी सर्व प्रकारच्या पालेभाज्या भाव वाढले आहेत.

Loading...

सध्या भाजीपाला पाण्याअभावी जागेरच वाळुन जात असल्याचे दुर्दैवी चित्र आहे.त्यामुळे जवळपास सत्तर टक्के भाजीपाला आवक कमी झाल्याने व लग्न सराई असल्याने भाज्यांची मागणी वाढल्यामुळे भाज्यांच्या भावात लक्षणीय वाढ झाली आहे.

तिर्थक्षेञ तुळजापूरला सोलापूर येथुन भाजीपाला येतो तसेच जवळपास पंचवीस गावातुन शेतकरी आपल्या शेतात पिकवलेला भाजीपाला विक्रीस आणतात .तुळजापूर शहरात दोन भाजीमंडई असुन आठवडा बाजार मंगळवारी भरतो येथुन ग्राहक भाजीपाला खरेदी करतात .

सध्या भेंडी वांगे चाळीस रुपये किलो हिरवी मिरची साठ रुपये किलो.मटकी पन्नास रुपये किलो काकडी पन्नास रुपये किलो दराने विकली जात आहे.तर लिंबु दोन रुपयाला ऐक नग या प्रमाणे भाजीमंडईत विकत मिळत आहात. या भाववाढीचा लाभ व्यापारी व दलालांना होत असुन पिकवणारा शेतकरी व ग्राहकांना याचा मोठा फटका बसत आहे.Loading…


Loading…

Loading...