पावसाच्या तडाख्याचा वीटभट्टी व्यावसायिकांना फटका

कच्च्या विटांचा चिखल झाल्याने व्यावसायिकांचे मोठे नुकसान

ठाणे : वीटभट्टी हा जोडधंदा असलेल्या शेतक-यांना आणि व्यावसायिकांना ओखी वादळामुळे आलेल्या पावसामुळे फटका बसला. अनेक ठिकाणी कच्च्या विटांचा चिखल झाल्याने व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ओखीच्या नैसर्गिक आपत्तीच्या तडाख्यात सापडलेल्या वीटभट्टी मालकांनी शासनाकडे नुकसान भरपाईसाठी मागणी करणार असल्याचे सांगितले. वीटभट्टीवर काम करण्यासाठी वाडा, जव्हार, मोखाडा, शहापूर नाशिकच्या ग्रामीण भागातून शेकडो आदिवासी मजूर जिल्ह्यातील या वीटभट्ट्यांवर काम करुन आपला उदरनिर्वाह करतात. मात्र या पावसामुळे त्यांच्या रोजगारावरही परिणाम झाला आहे. त्यातच वीटभट्टीसाठी लागणारी माती ओलसर झाल्याने तयार होणाऱ्या विटांचे नुकसान झाले आहे. आधीच कच्च्या मालाच्या वाढत्या किमतींमुळे वीटभट्टीचे उत्पादन यावर्षीही घटणार असल्याने वीटभट्टी मालकांनी चिंता व्यक्त केली आहे.

You might also like
Comments
Loading...