वीरप्पनची कन्या विद्याराणी हिची तामिळनाडू भाजपा युवा मोर्चाच्या उपाध्यक्षपदी वर्णी

veerappan daughtar

तामिळनाडू- कुख्यात चंदन तस्कर वीरप्पन याच्या कन्येने काही महिन्यांपूर्वी भाजपामध्ये प्रवेश केला होता. तामिळनाडूमधील कृष्णानगरी येथे पार पडलेल्या पक्षाच्या एका कार्यक्रमामध्ये विद्या राणीला पक्षाचे सदस्यत्व देण्यात आलं होते. भाजपाचे सरचिटणीस मुरलीधर राव आणि माजी केंद्रीय मंत्री पॉन राधाकृष्णन यांच्या उपस्थित विद्या राणीने भाजपामध्ये प्रवेश केला होता.

आता भाजपाच्या तामिळनाडू प्रदेश कार्यकारिणीने वीरप्पनची कन्या विद्याराणी हिची तामिळनाडू भाजपा युवा मोर्चाच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष एल. मुरुगन हे राज्यात पक्षाचा विस्तार करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तसेच पुढील वर्षी तामिळनाडूमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवरती या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. तथापि, एआयएडीएमकेचे संस्थापक एमजी रामचंद्रन यांची दत्तक कन्या गीता, रामचंद्रन यांचे भाऊ एमसी चक्रपाणी यांचा मुलगा आर. प्रवीण आणि अभिनेत्री राधा रवी यांची पक्षाच्या राज्य कार्यकारिणी समितीत सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

दरम्यान, ज्यावेळी विद्याराणी यांनी पक्षात प्रवेश केला होता त्यावेळी त्यांनी केलेलं भाषण चांगलेच गाजले होते. “कोणाचीही जात आणि धर्म न पाहता मला गरिबांसाठी आणि मागासवर्गातील लोकांसाठी काम करायचं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लागू करण्यात आलेल्या सरकारी योजना सामान्य लोकांसाठी आहेत. मला त्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवायच्या आहेत,” असं मत पक्षप्रवेशानंतर बोलताना विद्याने व्यक्त केलं. “माझ्या वडीलांना निवडलेला मार्ग चुकीचा होता. मात्र त्यांनी नेहमीच गरिबांचा विचार केला,” असंही तिने आपल्या भाषणात म्हटलं.

महत्वाच्या बातम्या-

संजय राऊत, सुशांत सुशांत सिंह राजपूतला ‘हा’ रोल करणार होते ऑफर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गृहमंत्र्यांप्रमाणे रझा अकादमीची पाठराखण करतात का?

आघाडीत बिघाडी : सरकार आघाडीचे आहे याची काळजी घ्या, राहुल गांधींच्या खास व्यक्तीने खडसावले

ठाकरे सरकारची ‘मुघलराज’शी तुलना, मुंबईत गुन्हा दाखल