वंचित कॉंग्रेससोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांना पाहिजेत ‘एवढ्या’ जागा

टीम महाराष्ट्र देशा : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने कॉंग्रेससोबत जाण्यासाठी तयारी दर्शवली आहे. जर कॉंग्रेसने ४० जागा दिल्या तर आपण कॉंग्रेससोबत युती करू अस प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे.

मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसने ४० जागा दिल्या तरच सोबत जाऊ अस जाहीर केले तसंच आगामी निवडणुका बॅलेट पेपरवरच घ्याव्या अशी मागणी केली. पुढे बोलताना ‘आम्ही आधीच आमची भूमिका जाहीर केली आहे. काँग्रेस काही भागात तुल्यबळ नाही. माझी असदुद्दीन ओवेसींसोबत बैठक झाली. आमची आघाडी पुढे कायम ठेवण्याचं आमचं ठरलं आहे असही आंबेडकर म्हणाले आहेत.

दरम्यान,एमआयएमने वंचितकडे १०० जागांची मागणी केल्याची माहिती होती. परंतु एमआयएमची १०० जागांची मागणी आमच्याकडे पोहोचली नाही, असंही आंबेडकर यांनी स्पष्ट केलं.