विधानसभेच्या लढाईसाठी वंचित बहुजन आघाडी सज्ज; पुण्यात खलबतं

प्रकाश आंबेडकर

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकी पाठोपाठ आता राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. या विधानसभा निवडणुकीसाठी भाजप विरोधी पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे.

लोकसभा निवडणुकीचे अपयश विसरून वंचित बहुजन आघाडीचे नेते आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेले दिसत आहे. आज वंचित आघाडीची पुण्यात महत्वपूर्ण बैठक झाली. ही बैठक विधानसभा निवडणुकीसाठीचा कार्यक्रम तयार करण्यासाठी घेण्यात आल्याची माहिती आहे. या बैठकीला प्रकाश आंबेडकर, गोपीचंद पडळकर, लक्ष्मण मानेंसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रातील सर्व म्हणजे ४८ जागांवर उमेदवार उभे केले होते परंतु त्यांना एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही.