वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवरांच्या यादीतील नावापुढे जातीचा उल्लेख

टीम महाराष्ट्र देशा : २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने उमेदवारांच्या नावाच्या पहिल्या यादीची घोषणा केली आहे. यात महाराष्ट्रातील एकून ३७ मतदारसंघांच्या उमेदवारांच्या नावाचा समावेश आहे. या यादीत उमेदवारांच्या नावापुढे त्यांच्या जातीचा देखील उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे सोशल मिडीयावर ही यादी खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. उमेदवारांच्या जातीच्या उल्लेखाला काही लोकांनी विरोध दर्शविला आहे ,तर काहींनी याला समर्थन केलं आहे. यादी जाहीर करताना प्रकाश आंबेडकरांनी सोलापूर व अकोल्याच्या जागेसंदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल असं सांगितलं.

 

हे आहेत वंचित बहुजन आघाडीचे ३७ उमेदवार

१. वर्धाः धनराज वंजारी
२. रामटेकः किरण रोडगे-पाटनकर
३. भंडारा-गोंदियाः एन. के. नान्हे
४. गडचिरोली-चिमूरः डॉ. रमेश गजबे
५. चंद्रपूरः अ‍ॅड. राजेंद्र महाडोळे
६. यवतमाळ-वाशिमः प्रो. प्रवीण पवार
७. बुलडाणाः बळीराम सिरस्कार
८. अमरावतीः गुणवंत देवपारे
९. हिंगोलीः मोहन राठोड
१०. नांदेडः प्रा. यशपाल भिंगे
११. परभणीः आलमगीर खान अखिल मोहम्मद खान
१२. बीडः प्रा. विष्णू जाधव
१३. उस्मानाबादः अर्जुन सलगर
१४. लातूरः राम गारकर
१५. जळगावः अंजली रत्नाकर बाविस्कर
१६. रावेरः नितीन कांडेलकर
१७. जालनाः डॉ. शरदचंद्र वानखेडे
१८. रायगडः सुमन कोळी
१९. पुणेः अनिल जाधव
२०. बारामतीः नवनाथ पडळकर
२१. माढाः अ‍ॅड. विजय मोरे
२२. सांगलीः जयसिंग शेंडगे
२३. साताराः सहदेव एवळे
२४. रत्नागिरी-सिंधुदुर्गः मारुती रामचंद्र जोशी
२५. कोल्हापूरः डॉ. अरुणा माळी
२६. हातकणंगलेः अस्लम बादशाहजी सय्यद
२७. नंदुरबारः दाजमल गजमल मोरे
२८. दिंडोरीः बापू केळू बर्डे
२९. नाशिकः पवन पवार
३०. पालघरः सुरेश अर्जुन पडवी
३१. भिवंडीः डॉ. ए. डी. सावंत
३२. ठाणेः मल्लिकार्जुन पुजारी
३३. मुंबई दक्षिणः डॉ. अनिल कुमार
३४. मुंबई दक्षिण मध्यः डॉ. संजय भोसले
३५. ईशान्य मुंबईः संभाजी शिवाजी काशीद
३६. मावळः राजाराम पाटील
३७. शिर्डीः डॉ. अरुण साबळे