लोकसभेची सेमीफायनल- वसुंधरा राजे त्रिपुरसुंदरी मंदिरात

टीम महाराष्ट्र देशा – आज जाहीर होत असलेल्या पाच राज्यांच्या निकालात काँग्रेसने बहुमताच्या दिशेने आगेकूच केली आहे. राजस्थान, छत्तीसगड राज्यात कॉंग्रेस बहुमताच्या दिशेने जाताना दिसत आहे. तर मध्यप्रदेश मध्ये अजून चित्र अस्पष्ठ आहे.

राजस्थान मध्ये भाजपा पिछाडीवर जाताना दिसत आहे.  राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे शिंदे यांनी बांसवाडा येथील त्रिपुरसुंदरी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. मागच्या वेळी मतमोजणीच्या काळात वसुंधराराजे दिवसभर मंदिरात उपस्थित होत्या. मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलानुसार काँग्रेस बहुमताकडे वाटचाल करत आहे. अंतिम निकाल अजून स्पष्ठ झाला नसला तरी भारतीय जनता पक्ष सत्तेपासून दूरच राहील. अशी चिन्हे आहेत.

You might also like
Comments
Loading...