वसुबारसेला गाईच्या कालवडीचा आगळ्यावेगळ्या पद्धतीने नामकरण सोहळा

पुणे: आज वसुबारस… दिवाळीला ख-या अर्थाने आज सुरुवात होते… वसुबारसेला राज्यभरात गोमातेची आणि वासराची पूजा केली जाते. पुण्यातील पिंपळे सौदागर येथे आज आगळी वेगळी वसुबारस साजरी करण्यात आली… कपिला कालवडीचा नामकरण समारंभ म्हणजे बारसं करण्यात आलं.

वसुबारस आणि नुकत्याच जन्मलेल्या कालवडीचं बारसे समारंभाची लगबग पुण्यात पाहायला मिळाली. कपिला जातीच्या गायीच्या कालवडीला छान सजविलेल्या पाळण्यात ठेवून नामकरण करण्यात आले. आपल्या मुलांप्रमाणे जनावरांनादेखील जीव लावणारे शेतकरी कुटुंब यानिमित्ताने पाहायला मिळत आहेत.

पिंपळे सौदागर येथील काटे कुटुंबानी हा आगळ्या वेगळ्या पद्धतीने वसुबरास साजरा करण्यात आला आहे.
लेक वाचवा…देश वाचवा हा संदेश यानिमित्ताने येणाऱ्या प्रत्येकाला काटे कुटुंबीय देत आहेत. याचबरोबर हिंदू संस्कृती जपली जावी यानिमित्ताने लोक, समाज एकत्र येतो त्यामुळे असे कार्यक्रम घेणे गरजेचे असल्याच काटे म्हणतात. त्याचबरोबर यातून सामाजिक संदेश देण्याचा प्रत्यन करण्यात आला आहे.

You might also like
Comments
Loading...