काँग्रेसची सत्ता आल्यावर मोदींना तुरुंगात टाकू, वसंत पुरकेंची धमकी

नागपूर: लोकसभा निवडणुका जवळ येऊ लागल्या असून कॉंग्रेस-भाजपमधला संघर्ष देखील वाढू लागला आहे. एकमेकांवर टीका करताना कॉंग्रेस नेत्यांनी सर्व सभ्यता पायदळी तुडविल्याचे पहायला मिळत आहे. आज जनसंघर्ष यात्रेदरम्यान बोलताना काँग्रेस नेते आणि माजी मंत्री वसंत पुरके यांचा जीभेवरील ताबा सुटल्याचं पहायला मिळालं.

मोदींच्या काँग्रेसमुक्त भारत घोषणेचा समाचार घेताना पुरके यांची जीभ घसरली. काँग्रेस मोदींच्या बापाची मालमत्ता नाही, असं वादग्रस्त विधान त्यांनी केलं.तसेच काँग्रेसची सत्ता आल्यावर मोदींना तुरुंगात टाकूअशी धमकी देखील पुरके यांनी देवून टाकली. विशेष म्हणजे याआधीच्या जनसंघर्ष यात्रेतील भाषणावेळीही पुरकेंनी असंच वादग्रस्त विधान केलं होतं.

You might also like
Comments
Loading...