fbpx

२० कोटींच्या वर संपत्ती घोषित केलेल्या खासदारांना पगारवाढ कश्याला हवी- वरुण गांधी

varun gandhi

नागपूर: भाजप खासदार वरून गांधी यांनी स्वतःचा पगार वाढवून घेणाऱ्या लोकप्रतिनिधींचा चांगलाच समाचार घेतला. संसदेच्या दोन्ही सभागृहात अनेक श्रीमंत खासदार असताना तेच खासदार हात ऊंचावून स्वतःचे पगार वाढवून घेतात हे दुर्दैवी असल्याचे वरुण गांधी म्हणाले. ते नागपुरात युवा सन्मान सोहळ्यात बोलत होते.

वरून गांधी म्हणाले, देशातील लोकसभा आणि राज्यसभेमधील २०० खासदारांनी २० कोटींच्या वर संपत्ती घोषित केली आहे. तरी यांना पगारवाढ कशाला हवी. गेल्या ९ वर्षात मी स्वतः एकही रुपया पगार घेतला नसून पगारवाढीचा मी संसदेत विरोध केला होता आणि भविष्यातही करत राहणार. तसेच लोकसभा अध्यक्षांनी अशा सर्व श्रीमंत खासदारांचे पगार थांबवण्यासाठी प्रयत्न करावे, देशात एक मोहीम सुरु करावी अशी मागणी वरुण गांधी यांनी केली.

1 Comment

Click here to post a comment