वारणा धरण पूर्ण क्षमतेने भरले ; विसर्ग सुरु

Varna Dam sangli

सांगली : सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात पूर्ण क्षमतेने भरले आहे . धरणात आज 34.40 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.

सातारा जिल्ह्यातील कोयना धरणामध्ये 98.35 टी.एम.सी इतका पाणीसाठा असून धरणाची साठवण क्षमता 105.25 टी.एम.सी, धोम धरणात 11.30 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 13.50 टी.एम.सी, कन्हेर धरणात 9.56 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 10.10 टी.एम.सी. आहे .

कोल्हापूर जिल्ह्यातील दूधगंगा धरणात 23.74 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 25.40 व राधानगरी धरणात 8.31 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 8.36 टी.एम.सी. आहे. अलमट्टी धरणात 119.57 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 123 टी.एम.सी. आहे.

सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे वारणा धरणातून 13 हजार 50 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू असल्याचे जलसंपदा विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

1 Comment

Click here to post a comment