भिडे -एकबोटेंच्या समर्थनार्थ वारकरी-धारकरी उतरणार सोबत रस्त्यावर

२८ मार्च रोजीच्या मोर्च्याला वारकरी संप्रदायाचा जाहीर पाठिंबा!

पुणे – २८ मार्च रोजी महाराष्ट्रभर होणाऱ्या भिडे गुरुजी सन्मान मोर्चाला वारकरी संप्रदायाने जाहीर पाठिंबा देत असल्याची घोषणा केली आहे. वारकरी संप्रदायाचे प्रवक्ते हभप बंडातात्या कराडकर यांनी श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान पुणे जिल्ह्याचे कार्यवाहक श्री संजय जढर व श्री अविनाश मरकळे यांच्याकडे कराडकर यांनी पाठिंब्याचे पत्र दिले आहे. याशिवाय रोज पाठींबा देणाऱ्या संघटना पुढे येत असून आतापर्यंत १२५ हून अधिक संघटना तसेच गणेश मंडळांनी पाठींबा दिला असल्याचा दावा देखील श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानकडून करण्यात आला आहे.

bandatatya

संभाजी भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटे यांना कोरेगाव भिमा प्रकरणामध्ये निष्कारण गोवले गेले असल्याच्या निषेधार्थ बुधवार, दि २८ मार्च रोजी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हाधिका-यांना महामोर्चा काढून निवेदन देण्यात येणार आहे. श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा पुणे जिल्ह्याचा महामोर्चा शनिवारवाडा येथून सकाळी १०.३० वाजता सुरु होणार असून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे,