मोठी बातमी : भीमा कोरेगाव प्रकरणी अटकेत असणाऱ्या वरवरा राव यांना कोरोनाची लागण

varvara rao

मुंबई : भीमा कोरेगाव प्रकरणी अटक करण्यात आलेले 81 वर्षीय राजकीय कार्यकर्ते आणि कवी वरवरा राव यांना मुंबईतील जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आज स्पष्ट झाले आहे. जेजे रुग्णालयाचे डीन डॉ. रणजित माणकेश्वर यांनी याबाबत माहिती दिली.

‘वरवरा राव यांना न्यूरॉलॉजी विभागात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्या विविध टेस्ट केल्या जातील. त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. महत्त्वाचे सर्व अवयव योग्य पद्धतीने कार्य करत आहेत. 2-3 दिवसात सर्व टेस्ट झाल्यानंतरच डॉक्टर त्यांचं मत मांडतील’ असं ते दोन दिवसांपूर्वी म्हणाले होते. आज वरवरा राव यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यांची प्रकृती ढासळत असल्याचं त्यांच्या तुरुंगातील सहकाऱ्यांनी सांगितलं होतं.

शासनाची बाजू अशीच भक्कमपणे मांडा, मराठा आरक्षणाच्याबाबतीत मुख्यमंत्र्यांसमवेत उपसमितीची बैठक

वरवरा यांचं वय झालं आहे, त्यांची प्रकृतीही चांगली नाही. यादृष्टीने त्यांना जामीन देण्यात यावा, अशी मागणी असंख्य सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. दोन महिन्यांपूर्वी बेशुद्ध झाल्याने वरवरा यांना जेजे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यांना पाईल्स आणि हृदयाशी संबंधित आजार आहे. अल्सर आणि रक्तदाबाच्या गोळ्या सुरू आहेत.

वरवरा राव 81 वर्षांचे आहेत. सोमवारी त्यांनी मुंबईच्या उच्च न्यायालयता तात्पुरत्या जामिनासाठी अर्ज केला होता. तब्येत खालावलेली असल्याने जामीन मिळावा, अशी त्यांची विनंती होती. पण जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला.

‘अगोदर ठाकरे कुटुंबावर बोललं तर शिवसैनिक चोपायचे, आताचे शेंबडे शिवसैनिक तक्रार करून शांत होतात’