शहरी माओवादी म्हणून अटक करण्यात आलेले ५ जण नेमके आहेत तरी कोण ?

टीम महाराष्ट्र देशा- एल्गार परिषदेतील आयोजनामध्ये नक्षलवाद्यांचा सहभाग आणि आर्थिक मदत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता पुणे पोलिसांनी माओवाद्यांच्या थिंक टँकवरच हल्ला केला. मंगळवारी देशभरात एकाच वेळी मुंबई, ठाणे, हैदराबाद, रांची, फरिदाबाद, दिल्लीत छापेमारी करून टॉपच्या पाच संशयित शहरी माओवाद्यांना पुणे पोलिसांनी अटक केल्याने खळबळ उडाली आहे.
तेलगू कवी वरवरा राव, अरुर परेरा, गौतम नवलखा, वर्णन गोन्सालवीस, सुधा भारद्वाज यांची नावे समोर आल्याने ही कारवाई केली. पोलिसांनी जप्त केलेल्या एका पत्रामध्ये तर नवलखाचा कश्मीरमधील फुटीरवाद्यांशी संबंध असल्याचे समोर आले आहे.

वरवरा राव –
कवी वरवरा राव हे देशातील टॉपचे माओवाद्यांचे समर्थक आहेत. कवी, विचारवंत म्हणून त्यांची ख्याती असल्याने त्यांच्या शब्दाला माओवाद्यांमध्ये वजन आहे. बंदी घातलेल्या माओवादी संघटनेला त्यांचे समर्थन आहे. त्याअनुषंगाने हैदराबादेमध्ये राव यांच्याकडे चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांना अटक केली गेली आहे.

अरुर परेरा –
अरूर परेरा यांना यापूर्वी नक्षलवाद्यांशी संबंधित प्रकरणात अटक झाली होती, त्यामध्ये त्यांची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर सध्या ते वकिली करत आहेत.

वेरनॉन गोन्सालवीस –
वेरनॉन गोन्सालवीस हे सात वर्षे शिक्षा भोगून बाहेर आले आहेत. सध्या माओवाद्यांच्या अनेक चळवळीत सक्रिय.

गौतम नवलखा –
दिल्लीमध्ये गौतम नवलखा हे प्रसिद्ध नाव आहे. ते माओवाद्यांशी संबंधित असल्याचा संशय आहे. कश्मीरमधील फुटीरवाद्यांशीही संबंधित असल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले आहेत.

Loading...

सुधा भारद्वाज –
सुधा भारद्वाज या देखील माओवाद्यांशी संबंधित आहेत. त्यांचाही उल्लेख पत्रव्यवहारात आहे.

कुख्यात गुन्हेगार छोटा राजनचा हस्तक राव अटकेत

Loading...