वाराणसी दुर्घटना; मृताच्या नातेवाईकांना ५० लाखांची मदत द्या – राज बब्बर

वाराणसी – वाराणसीमध्ये मंगळवारी सांयकाळी केंट रेल्वे स्थानकाजवळील उड्डाणपुलाचा काही भाग कोसळला होता. मागील तीन वर्षांपासून याचे काम सुरू होते. या दुर्घटनेत १८ जणांचा बळी गेला होता तर २५ जण जखमी झाले होते. अपघातातील काही जखमींची स्थिती गंभीर आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याप्रकरणी दुख: व्यक्त करत उच्च स्तरीय समिती गठीत करण्याचे आदेश दिले होते. त्याचबरोबर मृतांच्या नातेवाईकांना ५-५ लाख रूपयांची नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली होती.

दरम्यान या पार्श्वभूमीवर राज बब्बर हे बुधवारी येथे आले होते. त्यांनी या दुर्घटनेतील जखमी आणि त्यांच्या नातेवाईकांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली होती. या अपघातामुळे निराश झाल्याचेही त्यांनी म्हटले. तसेच मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी ५० लाख रुपयांची मदत देण्यात यावी असही त्यांनी म्हंटल आहे . दरम्यान याप्रकरणी बब्बर म्हणाले, मला सांगण्यात आले की, निवडणुकीपूर्वी उड्डाणपुलाचे काम होण्यासाठी तीन विनायक मंदिर पाडण्यात आले होते. हे मंदिर पाडल्यामुळेच ही दुर्घटना झाल्याची लोकांची धारणा असल्याचेही ते म्हणाले.

You might also like
Comments
Loading...