वाराणसी उड्डाणपुल दुर्घटनेत १८ जणांचा मृत्यू ; हलगर्जीपणा करणारे चार अधिकारी निलंबित

वाराणसी : उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये उड्डाणपुलाचा भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत १८ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. याप्रकरणात हलगर्जीपणा करणाऱ्या चार अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. यामध्ये प्रकल्प अधिकाऱ्याचाही समावेश आहे.

वाराणसीतील कँट स्टेशनजवळ उड्डाणपुलाचा स्लॅब कोसळून अनेक गाड्या दबल्या गेल्या, तर यामध्ये तिथे असणारे अनेक लोकही दबले गेले. या निर्माणाधीन उड्डाणपुलाखालून मोठी वाहतूक होती. जो भाग गाड्यांवर कोसळला, तो भाग दोन महिन्यांपूर्वीच ठेवण्यात आला होता. मात्र तो लॉक करण्यात आलेला नव्हता, असं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत देण्याची घोषणा केली आहे.

You might also like
Comments
Loading...