व्यंकय्या नायडू यांचा उपराष्ट्रपती पदी दणदणीत विजय

वेबटीम : भाजप व राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार व्यंकय्या नायडू यांचा उपराष्ट्रपती पदी दणदणीत विजय झाला आहे. विरोधी पक्षांचे उमेदवार असणारे डॉ. गोपाळकृष्ण गांधी यांचा त्यांनी पराभव केला. या निवडणुकीत  व्यंकय्या नायडू यांना ५१६ मते पडली आहेत. तर गोपालकृष्ण गांधी यांना २४४ मते मिळाली. व्यंकय्या नायडू हे भारताचे १३ वे उपराष्ट्रपती असणार आहेत.

दरम्यान एनडीए आघाडीकडे असलेल्या मतांच्या आकडेवारीपेक्षा अधिकची मते नायडू यांना मिळाली आहेत. ७७१ पैकी ५१६ मते व्यंकय्या नायडू यांना मिळाली असल्याने विरोधीपक्षांची मते राष्ट्रपती निवडणुकी प्रमाणेच याही निवडणुकीत फुटली असल्याच दिसून येत आहे

You might also like
Comments
Loading...