भाजपाचे नुकसान होईल, असा निर्णय वनगा कुटुंबीय घेतील असे वाटत : मुख्यमंत्री

वनगा कुटुंबाने व्यक्त केलेल्या व्यथेमुळे भाजपची सर्वत्र नाचक्की

टीम महाराष्ट्र देशा- गेले तीन महिने साधी विचारपूस करण्यास वेळ नसलेल्या भाजपला वनगा कुटुंबाने शिवसेनेत प्रवेश केल्याने हादरा बसला आहे. वनगा कुटुंबाने व्यक्त केलेल्या व्यथेमुळे भाजपची सर्वत्र नाचक्की झाल्याने डॅमेज कंट्रोलसाठी मुख्यमंत्र्यांनी स्वतः पुढाकार घेतला आहे. भाजपाचे नुकसान होईल, असा निर्णय वनगा कुटुंबीय घेतील असे वाटत नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.स्थानिक राजकारणात दिशाभूल करण्यात आल्यानेच त्यांनी हा निर्णय घेतल्याचेही मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांना सांगितले.

vanga famelly

मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
चिंतामण वनगा यांचे पक्षासाठीचे योगदान खूपच मोठे आहे. भाजपाचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर पालघर लोकसभा निवडणुकीत त्यांच्या मुलालाच उमेदवारी देण्याचा निर्णय झाला होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासोबत चर्चाही झाली होती. मात्र वनगा कुटुंबीयांनी अचानक वेगळी भूमिका घेतली. .स्थानिक राजकारणात दिशाभूल करण्यात आल्यानेच त्यांनी हा निर्णय घेतला. भाजपाचे नुकसान होईल, असा निर्णय वनगा कुटुंबीय घेतील असे वाटत नाही.