काँग्रेसचा ‘हा’ आमदार म्हणतो, शरियत परवानगी देत नाही, ‘वंदे मातरम’ म्हणणार नाही

टीम महाराष्ट्र देशा -शरियत आम्हाला परवानगी देत नाही म्हणून मी वंदे मातरम म्हणणार नसल्याचे जाहीरपणे सांगितले आहे. मध्यप्रदेशातील कॉंग्रेसचे आमदार आरीफ मसूद यांनी जाहीरपणे आपण वंदे मातरम म्हणणार नाही असे सांगितले आहे.

मेव समाजाच्या सभेमध्ये भाषण करताना मसूद यांनी आपण वंदे मातरम म्हणणार नाही असे सांगितले आहे. त्यांच्या आधी भाजपच्या माजी आमदाराने भाषण केलं होतं आणि भाषणाचा शेवट वंदे मातरमची घोषणा देऊन केला होता.

Loading...

हाच धागा पकडत मसूद यांनी म्हटले की माझ्या आधीच्या वक्त्यांप्रमाणे मी वंदे मातरम म्हणणार नाही कारण शरियत त्याची परवानगी देत नाही. मसूद यांनी त्यांच्या भाषणामध्ये प्रेक्षकांमध्ये बसलेले काही मुस्लिम विचारवंत हे देखील वंदे मातरमच्या घोषणादेत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले.

मध्य प्रदेशात भाजपने सचिवालय कार्यालयामध्ये महिन्याच्या पहिल्या दिवशी वंदे मातरम म्हणण्याची प्रथा सुरू केली होती. काँग्रेसने सत्तेवर येताच ही प्रथा बंद केली होती. आता विरोधात असलेल्या भाजपने याविरोधात जोरदार मोर्चा उघडल्याने काँग्रेसने घूमजाव करत महिन्याच्या पहिल्या दिवशी वंद मातरम म्हणण्याची परंपरा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
महाविकास आघाडीचे 'जनक देवेंद्र फडणवीस' आहेत : शिवाजीराव आढळराव पाटील
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
...अन्यथा इंदोरीकरांच्या तोंडाला काळं फासू; असा इशारा देणाऱ्या तृप्ती देसाईंवर मनसेच्या रणरागिणीचा प्रतिइशारा
इंदुरीकर-देसाई वादात आता 'भोर' महाराजांची ऊडी ; देसाईंना कापून टाकण्याची धमकी
'...यासाठी राज ठाकरेंची दहशत हवीच'
गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाला 'बळी' पडलो; मोदींवर विश्वास ठेवला, मात्र घडलं 'भलतंच'
आणि... अजित दादांमुळे मुख्यमंत्र्यांवर ओढविणारी नामुष्की टळली