fbpx

वंदे मातरम हे इस्लाम विरोधी, समाजवादी पक्षाच्या खासदाराने उधळली मुक्ताफळे

टीम महाराष्ट्र देशा : १७ व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशना वेळी नवोदित खासदारांना शपथ दिली जात आहे. काही खासदार शपथविधी वेळी जय श्री राम अशा घोषणा देत आहेत. मात्र या घोषणांवर लोकसभेतील खासदारांनी आक्षेप नोंदवला आहे. असे असतानाच आता समाजवादी पक्षाचे खासदार शफीकुर्र रहमान बर्क यांनी संसदेत शपथ ग्रहण करताना वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ‘वंदे मातरम हे इस्लाम विरोधी आहे’ असे त्यांनी म्हंटल आहे.

खासदारकीची शपथ ग्रहण करण्यासाठी ८८ वर्षीय शफीकुर्र रहमान बर्क पुढे येताना सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांकडून ‘वंदे मातरम’च्या घोषणा करण्यात आल्या. यानंतर शपथ ग्रहण केल्यानंतर बर्क यांनी ‘संविधान जिंदाबाद’ म्हणतानाच ‘वंदे मातरम इस्लामविरोधी आहे. आम्ही ते मान्य करू शकत नाही’ असं म्हटलं. यामुळे भाजपा सदस्यांनी ‘शेम शेम’च्या घोषणा दिल्या.

दरम्यान हैदराबादचे नवनिर्वाचित सदस्य आणि एआयएमआयएम नेते असदुद्दीन ओवैसी यांनीही यावेळी शपथ ग्रहण केली. असदुद्दीन शपथ घेण्यासाठी पुढे आले तेव्हा संसदेत ‘जय श्रीराम’ आणि ‘भारत माता की जय’ च्या घोषणा दिल्या गेल्या.