वंदना चव्हाण यांच्या घरासमोर मराठा आंदोलकांचा ‘घंटानाद’

पुणे : राज्यभरात मराठा आरक्षण प्रश्न चांगलाच पेटला आहे. या आंदोलनाला राज्यात हिंसेचे गालबोट देखील लागलं आहे. तर काही ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलक ठिय्या मांडून बसले आहेत. या आंदोलनाचा पुढचा भाग म्हणून मराठा आंदोलक आता आमदार आणि मंत्र्यांच्या घरांसमोर ठिय्या मांडत आपल्या मागण्या मांडणार आहेत.

पुण्यात आजपासून मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने लोकप्रतिनिधी आणि मंत्र्यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे. त्यानुसार आज राष्ट्रवादीच्या राज्यसभा खासदार आणि शहराध्यक्ष वंदना चव्हाण यांच्या घरासमोर घंटानाद करत आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

राज्यामध्ये 58 मोर्चे निघाले त्यावेळी हेच लोकप्रतिनिधी आम्हाला मोर्चात सहभागी करून घ्या म्हणत होते , मात्र आता त्यांना विसर पडलाय . या लोकप्रतिनिधीनी लोकसभा आणि विधानसभेत आपली भूमिका पार पाडावी यासाठी हे आंदोलन आहे. असल्याची भूमिका यावेळी आंदोलांनी मांडली.

राज्यभरात सुरु असलेलं मराठा क्रांती मोर्चाचे हे आंदोलन काही ठिकाणी शांततेत सुरु आहे, तर काही ठिकाणी याला हिंसक वळण लागलं आहे. मराठा आरक्षणासाठी बीड जिल्ह्यातील परळीतही १८ जुलैपासून मराठा मोर्चाच्या वतीने ठिय्या आंदोलन सुरु करण्यात आलं, जे अद्याप सुरुच आहे.

आता भंडारा जिंकू “ठोकून”, तर पालघर जिंकू “ठासून”

एसटी चालकांनी बसस्थानकाच्या गेटवर चढुन केले आंदोलन