वंदना चव्हाण , देसाईंचा ‘मराठी’बाणा: तर महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांची हिंदीतून शपथ

नवी दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यसभेवर पुन्हा संधी मिळालेल्या वंदना चव्हाण आणि शिवसेनेचे अनिल देसाई यांनी आज मराठीमधून खासदार पदाची शपथ घेत आपला मराठीबाणा दाखवून दिला आहे. तर कधीकाळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले नारायण राणे यांनी हिंदीतून खासदार पदाची शपथ घेतली. राज्यसभेवर नव्याने निवडून आलेल्या खासदारांचा आज शपथविधी पार पडला.

मागील महिन्यात राज्यसभेच्या सहा जागांसाठी राज्यात निवडणूक घेण्यात आली. यामध्ये सहा जागांसाठी तेवढेच उमेदवार रिंगणात उतरल्याने निवडणूक बिनविरोध पार पडली. यामध्ये भाजपकडून प्रकाश जावडेकर नारायण राणे, के मुरलीधरण, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वंदना चव्हाण, काँग्रेसचे कुमार केतकर, शिवसेकडून अनिल देसाई यांची निवड करण्यात आली होती.

कधीकाळी शिवसेनेमध्ये असताना मराठीसाठी आग्रह धरणारे आणि आता भाजपवासी झालेले नारायण राणे यांनी हिंदीतून शपथ घेतल्याने नेटकऱयांकडून त्यांच्यावर टीका केली जात आहे. तर दुसरीकडे मात्र राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण यांनी शिवसेनेचे अनिल देसाई यांचं कौतुक होताना दिसत आहे.

पहा नारायण राणे यांचा हिंदीतून शपथविधी