Prakash Ambedkar | मुंबई : प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar ) यांनी उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसला युतीची ऑफर दिली आहे. वंचित बहुजन आघाडी ची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि काँग्रेससोबत युती करण्याची तयारी आहे. मात्र वंचितच्या युतीच्या भूमिकेवर ठाकरे गट आणि काँग्रेसकडून प्रतिसाद आलेला नाही. ठाकरे गट किंवा काँग्रेसकडून प्रतिसाद आल्यास युतीबाबत विचार करू असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
ठाकरे कुटुंब आणि आंबेडकर कुटुंब यांच्यात तीन पिढ्यांपासून संबंध आहेत. उद्धव ठाकरेंचे (Uddhav Thackeray) आजोबा प्रबोधनकार ठाकरे हे बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत अनेक उपक्रमांमधे सहभागी झाले होते असेही प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले. प्रबोधन ठाकरे यांनी सुद्धा मनस्मृतीचा निषेध केला होता असाही प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar ) यांनी यावेळी बोलताना म्हंटल आहे. बाळासाहेबांपासून आत्तापर्यंत शिवसेनेने मनस्मृतीचे समर्थन केलं नसल्याचे आंबेडकर म्हणाले. आम्ही शिवसेना किंवा कॉंग्रेससोबत युती करण्यास तयार आहोत. मात्र, त्यांच्याकडून अद्याप कोणताही प्रतिसाद आला नसल्याचे आंबेडकर यावेळी म्हणाले.
पुढे ते म्हणाले, आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत. अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक शिवसेनेच्या दोन्ही गटांसाठी महत्त्वाची आहे. मात्र बाळासाहेबांची शिवसेना-भाजप युतीतून कमळाचा उमेदवार आहे. त्यामुळे त्यांना पाठिंबा देण्याचा प्रश्नच येत नाही. आमच्याकडे कोणीही पाठिंबा मागितला नाही. त्यामुळे आम्ही कोणतीही भूमिका घेतलेली नाही, असं प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar ) यांनी सांगितलं.
दरम्यान, दुसरीकडे प्रकाश आंबेडकर यांनी शिंदे गट आणि भाजपाच्या युतीबाबत देखील मोठं वक्तव्य केलं आहे. जसे भाजपाला उद्धव ठाकरे नको होते तसेच आता एकनाथ शिंदे देखील नको आहेत. परिस्थिती अनुकूल राहिली तरच भाजप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदेंसोबत युती करेल. त्यामुळे आता आगामी महापालिका, नगर पालिका आणि नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये भाजप शिंदे गटासोबत युती करणार का? हे पहावे लागेल असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Breaking News । भाजप उमेदवार मुरजी पटेल यांच्या अर्जावर ठाकरे गटाचा आक्षेप, कारणही सांगितलं…
- Diwali 2022 | या वर्षी दिवाळी धनत्रयोदशी चा शुभ मुहूर्त कधी आहे, ते जाणून घ्या
- Historical moment | भारतीय महिला क्रिकेट संघाने रचला इतिहास! सलग 7व्यांदा जिंकला आशिया कप
- Deepak Kesarkar | ‘50 खोके एकदम ओक्के’ म्हणून डिवचणाऱ्या ठाकरे गटावर दीपक केसरकरांचा हल्ला
- Ajit Pawar | एकनाथ शिंदेंचा राष्ट्रवादीला झटका! अजित पवारांनी मंजूर केलेला निधी शिंदे-फडणवीस सरकारने रोखला