ईव्हिएम हटावो, देश बचावो, वंचित आघाडीचे राज्याभर आंदोलन

टीम महाराष्ट्र देशा : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्त्वात वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रभर ‘ईव्हिएम हटावो, देश बचावो’ आंदोलन पुकारले आहे. राज्यातील सर्व जिल्हा आणि तालुका मुख्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले.

नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडली, लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला दारूण पराभव स्वीकारावा लागला. राज्यात भाजप – सेना महायुतीला दणदणीत विजय मिळाला. परंतु मतमोजणीतील आकडेवारीत तफावत असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला.

Loading...

इतकेच नव्हे तर, मतमोजणीतील आकडेवारीत तफावत असल्याचा आरोप करत प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांच्या दालनासमोर आंदोलन करण्यात येत आहे. याचदरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश अध्यक्ष अशोक सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली अहमदनगरमध्ये जिल्हाधिकारी यांच्या दालनासमोर आंदोलन करण्यात आले. त्यावेळी ईव्हिएम हटावो, देश बचावो, विधानसभा निवडणुकित बॅलेट पेपरवर मतदान घ्यावे, अशी मागणी करण्यात आली.

इतकेच नव्हे तर, लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातल्या सर्व मतदारसंघाचे एकूण झालेले मतदान आणि प्रत्यक्ष मोजणी केलेले मतदान यामध्ये तफावत आढळून येते. याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करून देखील त्याची दखल घेतली जात नाही. त्यामुळे ‘ईव्हिएम हटाव देश बचाव’ चा नारा देण्यात येत आहे. असे वंचित आघाडीच्या पदाधिकार्यांनी म्हंटले आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
अरे तुम्ही काय संरक्षण काढता, पवारांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्रातील पैलवान सरसावले
धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का
अजित पवारांचे मेहुणे अमरसिंह पाटील यांचं निधन
जातीवाद रोखण्यासाठी शरद पवार मैदानात; सरकार उचलणार 'हे' पाऊल
'उद्धव ठाकरे अनुभवशून्य मुख्यमंत्री; महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे'
राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांची गुंडगिरी, 'इंडियन ऑईल'च्या अधिकाऱ्यांना केली हाणामारी
#शिवभोजन : ज्यांची ऐपत आहे त्यांनी 'शिवभोजन' घेऊ नये : अजित पवार
राष्ट्रवादीची गुंडगिरी : भाजपने केला सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल
सलमान अजूनही कतरीनाच्या प्रेमात स्वत:च दिली कबुली